Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यातासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत असून तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ६२५ रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल. शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये  प्रति तास मानधन मिळेल.

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात बैठकीत नेमकं काय ठरलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान यासाठी एक हजार रुपयांवरून १ हजार ५०० प्रति तास मानधन मिळेल. पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर ६०० रुपयांवरून एक  हजार रुपये प्रति तास असे करण्यात आले आहे. तर पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर ५०० रुपयांवरून ८०० रुपये प्रति तास असेल.

व्हॉट्सअ‍प ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सहायक प्राध्यापकांसह महाविद्यालयातील ‘ही’ पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर ७५० रुपयांवरून १ हजार ५०० प्रति तास तर कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर ६२५ रुपयांवरून एक हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे, असे पाटील यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या