Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याDrugs, OTT आणि शत्रू देश; विजयादशमी कार्यक्रमात काय म्हणाले मोहन भागवत?

Drugs, OTT आणि शत्रू देश; विजयादशमी कार्यक्रमात काय म्हणाले मोहन भागवत?

मुंबई l Mumbai

आज विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते.

- Advertisement -

दरम्यान नागपूरमध्ये आरएसएसचा विजयादशमी मेळावा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘शस्त्र पूजा’ केली आहे. मोहन भागवत यांनी OTT प्लॅटफॉर्म, रासायनिक शेती, अंमली पदार्थ, Bitcoin यांसह विवध विषयांवर भाष्य केल.

मोहन भागवत बोलतांना म्हणाले की, देशात अंमली पदार्थांचे आव्हान वाढले आहे. हे आव्हान कसे थोपवायचे हे एक मोठे आव्हान आहे. देशात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वापर वाढतो आहे. समाचातील उच्च वर्गापासून ते खालच्या स्तरापर्यंत अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचे दिसते. या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो. हे सर्वांना माहिती आहे. प्रामुख्याने सीमेपलीकडील देश त्याला प्रोत्साहन देत आहेत.

तसेच ते पुढे बोलताना म्हटले, बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. देशात अनियंत्रित गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मही तसेच आहे. लहान मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काय दाखविले जात आहे, यावर विचार करण्याची गरज आहे. कोरोना काळात लहान मुलांच्या मोबाईल वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

त्याचबरोबर भागवत यांनी बोलताना आसाम आणि मिझोराममधील पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून नाराजी व्यक्त केलीय. एकाच देशात आपल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

देशभरातील काही मंदिरे ही सरकारच्या ताब्यात आहेत. काही भाविकांच्या अधीन आहेत. परंतु, काही ठिकाणी हिंदूंची मंदिरे हडपण्याचे प्रकार दिसून येत आहेत. हिंदू धर्माविरुद्ध कार्य करण्याची स्थळे बनली आहेत. तेव्हा सर्व मंदिरे ही भाविकांच्या ताब्यात असायला हवी. त्याचे व्यवस्थापन भाविकांनी करायला हवे, असे भागवत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या