आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
राजकीय

आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीस विरोध

अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती अयोग्य

Kishor Apte

Kishor Apte

मुंबई:

राजशिष्टाचार मंत्री असले तरी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. अशावेळी या सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये; अध्यक्षपदी अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती करणे योग्य नाही', असे सांगत विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या समितीवरील नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

राज्य सरकारने पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. पण भाजपने मात्र आदित्य ठाकरेंच्या या नियुक्तीला विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांची ही नियुक्ती संयुक्तिक नसल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. 'पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड करणे खूप घाईचे आहे. अननुभवी अशा नवख्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठीची समिती तयार करणे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. जरी ते राजशिष्टाचार मंत्री असले तरी एका प्रकरणातसर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. अशावेळीया सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये; अध्यक्षपदी अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती करणे योग्य आहे', असे प्रविण दरेकर म्हणाले.सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com