Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याNashik News : नाशिकमध्ये झळकले इम्तियाज जलील यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून फलक

Nashik News : नाशिकमध्ये झळकले इम्तियाज जलील यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फलक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत सध्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले होते. आता यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातील चौक मंडई येथे एमआयएम पक्षाच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर खासदार इम्तियाज जलील यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

Independence Day : कॅबिनेट मंत्री की जिल्हाधिकारी… १५ ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण? वाचा संपूर्ण यादी…

नाशिकमध्ये एमआयएमच्या पक्षाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड योजना लोकांसाठी राबवण्यात येत आहे. याचे बॅनर नाशिकमध्ये लावण्यात आले आहे. यावर इम्तियाज जलील यांचा फोटो लावून ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

कोण आहेत इम्तियाज जलील?

इम्तियाज जलील यांचा जन्म 10 ऑगस्ट 1968 रोजी झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. तर भाऊ जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये त्यांनी तब्बल 23 वर्षे पत्रकारिता केली. त्यामुळे इम्तियाज जलील यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाची चांगली जाण आहे.

Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार, ‘या’ तारखेपासून सर्वदूर बरसणार

इम्तियाज जलील यांनी 2014 साली पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. एमआयएम पक्षात प्रवेश केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. एमआयएमने त्यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली. शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे इम्तियाज जलील यांना प्रचारासाठी फार थोडे दिवस मिळाले. मात्र, तरीही इम्तियाज जलील यांनी या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणला. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव केला.

आमदारकीची टर्म संपत नाही तोच इम्तियाज जलील यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी चालून आली. मात्र, त्यांच्यासमोर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीत सामील झाला होता. पहिल्याच प्रयत्नात इम्तियाज जलील यांनी सलग चार टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टीमेटम; काय आहे प्रकरण…

- Advertisment -

ताज्या बातम्या