पक्षविरोधी काम करणार्‍यांची तत्काळ हकालपट्टी करा
राजकीय

पक्षविरोधी काम करणार्‍यांची तत्काळ हकालपट्टी करा

खा. शरद पवार यांचे आदेश, शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केली चर्चा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वोसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची भेट केली. पक्षविरोधी काम करणार्‍यांची तत्काळ हकालपट्टी करण्याचे सांगून सगळ्यांना सोबत घेवून काम करावे असे आदेश त्यांनी दिलेत.

या भेटीमध्ये धुळ्यातील पक्षसंघटने बाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व प्रथम शरदचंद्र पवार यांनी शुभेच्छा देवून जोरदार काम करण्याचा सल्ला दिला. शहर व जिल्ह्यामध्ये पक्षाची परिस्थिती, संघटनातील बदल, पक्षांतर केलेले पदाधिकारी, पक्ष स्थापने पासून पक्षासोबत राहणारे निष्ठावंत, शहरातील नगरसेवक, कोविड परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली.

खा.पवार यांनी आक्रमकपणे पक्ष संघटनेवर जोर दिला. पक्षाच्या निष्ठावंतांना सोबत घ्या आणि पक्ष विरोधी काम करणार्‍यांना तात्काळ बाजुला करा असे स्पष्टपणे सांगितले. धुळ्यात भर्तीचे कार्यकर्ते नसले तरी चालेल, पण निष्ठेने काम करणारे थोडे असले तरी मला चालेल. पण भाऊगर्दी करु नका मला माहित आहे, काही लोक मुंबईत येवून पक्ष वाढीचे नाटक करतात आणि धुळ्यात दुसरेच काम करतात.

धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपाची बी टीम बनता कामा नये. भाजपा नेत्यांचे ऐकून चालणारे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नको. वेळीच त्यांना रोखा. पक्षविरोधी काम करणार्‍या तसेच गटातटाचे राजकारण करणार्‍यांना योग्य ती समज द्या. अन्यथा पुढील कारवाईसाठी माझ्याकडे प्रस्ताव सादर करा, मी त्याला मान्यता देतो, असेही ठणकावून सांगितले.

पक्ष संघटनेबाबत लकरच आपण धुळे जिल्हा दौरा करणार आहोत असे खा.पवार म्हणाले. धुळे शहर व जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची मला माहिती आहे, कोण काम करतो आणि कोण नाही? याची मी माहिती घेतली आहे असेही त्यांनी सांगितले.

शहर जिल्हाध्यक्ष पदाचे काम जोरात कर मी तूझ्या पाठीशी आहे असे शेवटी सांगितले. यावेळी खा.सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांच्याशी ही पक्षसंघटने सोबतच पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com