आ रहा हूँ मैं! फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर मलिकांचं ट्विट

आ रहा हूँ मैं! फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर मलिकांचं ट्विट

मुंबई | Mumbai

गेल्या महिन्याभरापासून मुंबईत एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांविरोधात आरोप केले आहेत.

एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. त्यानंतर आता मलिकांनी त्यांना उत्तर दिले आहेत.

आ रहा हूँ मैं! फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर मलिकांचं ट्विट
मुंबई बाँबस्फोटातील आरोपींनी कोट्यावधींची जमीन मलिकांना स्वस्तात का विकली ?

''आ रहा हूँ मैं'' असे सूचक ट्विट नवाब मलिकांनी केले आहे. तसेच आज २ वाजता पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. आता नवाब मलिक नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com