मतांची विभागणी टाळली तर आघाडीला यश

उपमुख्यमंत्री अजित पवार
मतांची विभागणी टाळली तर आघाडीला यश

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आपल्या मतांची विभागणी न होवू देता (do not split of votes ) आपण जागा वाटपात यशस्वी झालो तर जिल्हा परिषद( Zilla Parishad's ), पंचायत समिती( Panchayat Samities ) आणि नगरपालिका महाविकास आघाडीकडे ( Mahavikas Aaghadi ) यायला निश्चितपणे मदत होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Elections )स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे विधान प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. कुणी काय विधान करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणुकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्हयाला अधिकार द्यावा, असेही पवार म्हणाले.

स्थानिक निवडणुकीत आघाडी करण्याबाबत किंवा स्वतंत्र लढण्याचा निर्णय आपण स्थानिकांवर सोडला तर ते या सगळ्याचा साकल्याने विचार करतील. तेथील लोक रोज राजकारण आणि समाजकारण करत असतात. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. परंतु सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करत आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com