Friday, April 26, 2024
Homeराजकीयएकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतात, याची मी वाट पाहतोय - राज...

एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतात, याची मी वाट पाहतोय – राज ठाकरे

पुणे (प्रतिनिधि) / Pune – “माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन” असे वक्तव्य भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी केले होते. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतात याची मी वाट पहातोय असे राज ठाकरे म्हणाले.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे. ही अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहेत, ते मोकाट सुटलेले आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

सध्या राज्यात सरकार आणि भाजपामध्ये जे संघर्ष सुरू आहे किंवा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सुरू असलेली धूसमूस पाहता कोण कोणाचा शत्रू आहे आणि कोण कोणाचा मित्र आहे, हे कळतच नसल्याचे ठाकरे म्हणाले.

मग अडलं कुठं?

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठंय?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडकलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.

जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे. तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या