अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात उत्तर

अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात उत्तर

मुंबई | Mumbai

एका गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी एका डिझायनरने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना 1 कोटीची ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे...

दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांनी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनिल जयसिंघानी हा व्यक्ती फरार आहे. त्याची मुलगी 2015-2016 मध्ये अमृता फडणवीस यांना भेटली होती.

त्यानंतर 2021 मध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. डिझायनर असल्याचे सांगून तिने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आई वारल्याचे सांगून पुस्तक प्रकाशन करून घेतले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात उत्तर
विचित्र अपघात! ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह नंतर फुटले टायर; ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू

फडणवीस पुढे म्हणाले की, या मुलीने विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. त्यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा त्या मुलीने केला.

या मुलीने वडिलांना सोडविण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र त्यानंतर चुकीच्या प्रकरणात मदत करणार नसल्याचे अमृता फडणवीस यांनी या मुलीला स्पष्ट सांगितले व तिचा नंबर ब्लॉक केला.

त्यानंतर अज्ञात नंबरवरून व्हिडीओ पाठवण्यात आले. ज्यामध्ये एका बॅगेत पैसे भरल्याचा व्हिडीओ व दुसरी बॅग घर काम करणाऱ्या महिलेला दिल्याचा व्हिडीओ होता. ही बाब अमृता यांनी मला सांगितल्यानंतर याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात उत्तर
मोठी बातमी! लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही पायलट बेपत्ता

पोलिसांनी संबंधिताला जाळ्यात आडकवल्यानंतर त्याने या प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावही घेतली असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com