Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकेंद्राने महाराष्ट्राला किती मदत केली?

केंद्राने महाराष्ट्राला किती मदत केली?

मुंबई । प्रतिनिधी

करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र संकटात असतानाही विरोधी पक्ष भाजप मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला अशा कठीण परिस्थितीत किती मदत केली? हे सांगावे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी करोना काळात अन्य देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी दिलेल्या मदतीची माहिती देताना राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला पटोले यांनी आज प्रत्युत्तर दिले.

करोनामुळे महाराष्ट्रामोर आर्थिक संकट असताना जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना भाजपचे नेते मात्र सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहीले.केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली, अशी टीका पटोले यांनी केली.

राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले. राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे फडणवीस आणि भाजप नेत्यांनी मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले? मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या