शिवसेनेतील किती खासदार संपर्कात?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

शिवसेनेतील किती खासदार संपर्कात?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

दिल्ली l Delhi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत असा प्रश्न विचारला. एकनाथ शिंदे म्हणाले की, मी शिवसेनेच्या कुठल्याही खासदाराला भेटलेलो नाही. संपर्काचं म्हणाल तर मी मंत्री असल्याने खासदार रोजच संपर्कात असतात. यावेळी देवेंद्र फणडवीस यांनी शिंदेंच्या संपर्कात नक्कीच एक खासदार आहे, तो म्हणजे श्रीकांत शिंदे, असं विधान केलं.

तर एकनाथ शिंदे याबाबत अधिक स्पष्टता देताना म्हणाले की, कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. अनेक जण भेटीला येत असतात. तसेच जी चर्चा सुरू आहे. त्याप्रमाणे खासदारांची कुठली बैठक झाली याबाबत मला काही माहिती नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

15 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. यावर एकनाथ शिंदे यांनी कोणीही संपर्कात नसल्याचं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला. पण फडणवीसांनी एक नाव फोडल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com