गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची गुजरात सरकारवर टीका

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची गुजरात सरकारवर टीका

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

गुजरातमधील Gujrat अहमदाबाद महापालिकेने Ahmedabad Municipal Corporation शहरातील रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घातली आहे. या मुद्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लोकांनी काय खावे हे सुध्दा आता शासन ठरवणार काय? असा जाब त्यांनी गुजरात सरकारला विचारला आहे.

अहमदाबादमध्ये रस्त्यावर मासांहारी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. Street vendors selling non-vegetarian food have been banned या निर्णयावरून जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

८० टक्के मासांहारी असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरु झाला आहे. तुम्ही काय खावे हे सुध्दा आता शासन ठरवणार, असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com