राज ठाकरेंच्या सभेबाबत गृहमंत्री म्हणाले...

राज ठाकरेंच्या सभेबाबत गृहमंत्री म्हणाले...

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS President Raj Thackeray )यांच्या औरंगाबादच्या ( Aurangabad )सभेबाबत पोलीस आयुक्त येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil ) म्हणाले आहेत. तसेच राज्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यस्था बिघडवण्याचे प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र दिनी ( Maharashra Din )मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. मात्र, अद्याप राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळाली नाही, याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि राणा दाम्पत्यावरील कारवाई यावरही वळसे-पाटील यांनी भाष्य केले आहे.

खासदार नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक दिली असल्याचा आरोपाप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवनीत राणांचा कोठडीत छळ झाला असून त्यांना कोणतीही हीन वागणूक देण्यात आली नाही. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना तक्रार करत पत्र लिहिले आहे. याबाबत लोकसभा अध्यक्षांनी आमच्याकडे माहिती मागितली आहे. त्यामुळे नवनीत राणासंदर्भात लोकसभेच्या सचिवांना अहवाल पाठवला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळस-पाटील म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्र्यांनी किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाष्य केले. सौमैयांच्या तक्रारीचा तपास खार पोलीस करणार असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.