राज्यात अराजकता, राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी; गृहमंत्री म्हणतात...

राज्यात अराजकता, राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी; गृहमंत्री म्हणतात...

मुंबई | Mumbai

मुंबईत शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला राडा शनिवारीही सुरूच आहे. नवनीत राणा, रवि राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घातला, तर दुसरीकडे मोहित कंबोज यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला.

सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. असे राज्यात कधीच झालं नव्हतं असा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या प्रश्नांना उतर दिलं आहे.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, 'मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अतिशय उत्तम आहे. परंतु काही लोक या संदर्भात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे किंवा राहिली नाही, असं भासवण्यासाठी विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.'

तसेच राणा दाम्पत्याच्या कुठल्याही प्रश्नावर मला उत्तर द्यायचं नाही. परंतु मी एवढंच या निमित्त सांगतो की, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कुणीही या संदर्भातील कुठल्याही वेगळ्या सूचना आम्ही देत नाही. या संदर्भातील सर्व निर्णय हे पोलीस आयुक्तांनी घेऊन कारवाई करायची असते आणि त्या दृष्टीने मुंबईचे पोलीस आयुक्त कारवाई करतात.' असं त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.