Friday, April 26, 2024
Homeराजकीयगृहमंत्री अनिल देशमुखांकडून आठवलेंना काव्यात्मक अंदाजात सदिच्छा

गृहमंत्री अनिल देशमुखांकडून आठवलेंना काव्यात्मक अंदाजात सदिच्छा

मुंबई | Mumbai

करोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो (Go Corona Go ) अशी घोषणा देऊन सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना काल करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. काव्यात्मक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कविता करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी म्हंटलं आहे कि, ” ‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll रामदास आठवले लवकर बरे व्हा.”

अभिनेत्री पायल घोषचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश

दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोष यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कार्याक्रत्यांसह उपस्थित होते. पायल घोष हिने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारदेखील तिने दाखल केली होती. चौकशी न झाल्याने पायाल थेट राज्यपालांकडे गेली होती. या संपूर्ण प्रकारणामध्ये आरपीआयने पायलला पाठींबा दिला होता. दरम्यान, आता पायलने आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पायलचा पक्षप्रवेश पार पडला. पायलसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या