Saturday, April 27, 2024
Homeराजकीयफडणवीसांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करतात; गृहमंत्र्यांचा टोला

फडणवीसांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करतात; गृहमंत्र्यांचा टोला

पुणे । Pune

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा सुद्धा साधला.

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख बोलतांना म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली. दरम्यान, शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल, असं देशमुख म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या