अमित शहा आज मुंबईत; 'मिशन मुंबई महापालिके'चा श्रीगणेशा

अमित शहा आज मुंबईत; 'मिशन मुंबई महापालिके'चा श्रीगणेशा

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज संध्याकाळपासून मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेणार आहेत.

तसेच, काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठीही ते उपस्थिती लावणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ करणार असल्याचे कळते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठीच अमित शहा यांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार असल्याचे कळते.

असा असेल दौरा :

- आज रात्री ९.३० वाजता अमित शाह मुंबईत दाखल होणार

- उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार

- नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मग आशिष शेलार यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार

- शेवटी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची शक्यता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com