'उनकी कुंडली जम गई होगी'; खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे हे २३ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत
'उनकी कुंडली जम गई होगी'; खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

गेली ४० वर्ष ज्या पक्षात घालवली त्या भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ खडसे यांनी काल राजीनामा दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केला आहे. एकनाथ खडसे हे २३ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. मात्र, आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. गेल्या 40 वर्षे भाजपासाठी काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठं कारण असणार, उनकी कुंडली जम गई होगी... असे राऊत यांनी म्हटले आहे.

'उनकी कुंडली जम गई होगी'; खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
सोशल मीडियात खडसे समर्थक अन् विरोधकात वार

खडसेंना राजीनामा देण्याची गरज नव्हती - चंद्रकांत पाटील

नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरू होता. आज सकाळी जयंत पाटलांचे ट्वीट रिट्विट केले आणि मग डिलीट केले. तोवर आम्हाला आशा होती की, ते सोडून जाणार नाही. त्या क्षणापर्यंत दोर तुटेलेला नाही, असे आम्हाला वाटले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खडसेंचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. फडणवीसांनी ही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. परंतु यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्या घटनेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होते. त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, असेही ते म्हणाले.

खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत होते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com