शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे आमदार विधानभवनात दाखल

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे आमदार विधानभवनात दाखल

मुंबई | Mumbai

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर तब्बल पाच महिन्यांनी आज, गुरुवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात सुनावणी सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकत्रितरीत्या सुनावणी घेत आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे 14 तर शिंदे गटाचे 40 आमदार उपस्थित आहेत....

आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रणनीती ठरविण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी अध्यक्षांकडे वकिलपत्र सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ऍड. देवदत्त कामत आणि वकील ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत हे वकिलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहे, हे वकील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.

याआधी ठाकरे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केले होते. अगदी तशाच प्रकारे सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी वकिलपत्रात आपले लेखी म्हणणे अध्यक्षांकडे सादर केले आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे आमदार विधानभवनात दाखल
Maratha Reservation : "दिल्लीत मला विचारलं मनोज जरांगे कौन है"? CM शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकिलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडणार आहेत. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपले म्हणणे मांडण्यास विचारले गेल्यास आमदार आपली भूमिका मांडतील. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून सहा हजार पानी लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे.

या लेखी उत्तराबरोबरच उद्या काही पुरावेही शिंदे गटाकडून सादर केले जाणार आहेत. आपलाच पक्ष हा अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा युक्तिवाद पुन्हा एकदा शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांसमोर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे आमदार विधानभवनात दाखल
Jawan Box Office Collection : किंग खानचा बॉक्स ऑफीसवर बोलबाला; 'जवान'ने केली सातव्या दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com