Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याखरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; हसन मुश्रीफांचा आरोप

खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; हसन मुश्रीफांचा आरोप

मुंबई | Mumbai

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. तसेच, या पुढेही मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगिले.

- Advertisement -

सोमय्या यांच्या आरोपाला हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्यावर केलेले आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र (BJP’s Conspiracy) आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे या षडयंत्राचे मास्टरमाईंड आहेत, असे प्रत्युत्तर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे. चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही.’

सोमय्यावरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही, राऊत यांची माहिती

सोमय्या यांनी नेमका काय केला आरोप?

सोमय्या म्हणाले की, २०२० साली कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिलिंग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या