हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
राजकीय

फडणवीसांचा पोलिसांवर विश्वास नाही, हे दुर्दैव!

हसन मुश्रीफ यांची टीका

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर | Ahmednagar -

पाच वर्ष राज्याचे गृह खाते सांभाळलेल्या देवेंद्र फडणवीसांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवी असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. आज अहमदनगरला झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. Hasan Mushrif says It is unfortunate that Fadnavis does not trust the police!

ते म्हणाले, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीसाठी प्रभारी पद देण्यात आले. हे सर्व राजकारण आहे. ज्यांनी स्वतः गृहखाते सांभाळले तेच पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैवी आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com