सोमय्यांच्या आरोपांवर मुश्रीफांचं उत्तर; म्हणाले...

सोमय्यांच्या आरोपांवर मुश्रीफांचं उत्तर; म्हणाले...
हसन मुश्रीफ

मुंबई | Delhi

ठाकरे सरकारमधील अनिल परब (Anil Parab), अनिल देशमुख (Anil Deshmukh) नंतर तिसरे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) असलेल्या अनिलचे घोटाळे पुराव्यासाहित मी पुढच्या आठडवड्यात जाहीर करेन, अशी घोषणा भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केली होती.

त्यासंदर्भात आज ते पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) आणि त्यांच्या कुटुंबावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तसेच मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग (money laundering) आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना आता हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.

हसन मुश्रीफ
सोमय्यांच्या रडारावर आता ग्रामविकास मंत्री; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला आरोप

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सोमय्यांचे (Kirit Somaiya Allegations) आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच माझ्यावर बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करण्यात आले असून माझ्यावर असे आरोप होणार हे माहीत होतं असं मुश्रीफ (Hasan Mushrif)) यांनी म्हंटल. खर तर सोमय्यांना काहीही माहिती नाही. आमचे कोल्हापूरचे (Kolhapur) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge) यांनी माहिती दिली असेल. त्यांनी कागल (Kagal), कोल्हापूर ला येऊन माहिती घ्यावी असे खुलं आवाहन हसन मुश्रीफ यांनी दिले.

तसेच 'किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही (Election Commission) कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा (Abrunuksani claim) करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com