ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

कोल्हापूर | Kolhapur

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (MLA Hasan Mushrif) यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीकडून शनिवार (दि.११) रोजी छापेमारी (Raids)करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपासून मुश्रीफ नॉटरिचेबल होते. यानंतर आज ते कागलच्या निवासस्थानी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला…

शिंदे शिवारात बिबट्या जेरबंद

यावेळी ते म्हणाले की, ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू असल्याने मी तिथे होतो. आज कागलला कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो आहे. तसेच मी आज ईडीच्या चौकशीला हजर राहू शकणार नसून माझे वकील ईडीकडून मुदत मागणार आहेत. ज्या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, त्याचे समन्स (Summons) ईडीकडून मला पाठवण्यात आले आहे’. असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

Oscar Awards 2023 : भारताला यंदा दोन ‘ऑस्कर’; नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास

पुढे ते म्हणाले की, ‘माझे वकील (lawyer) माझी बाजू मांडतील. मार्च एंडिंग सुरू असल्याने मला अनेक कामांसाठी वेळ हवा आहे. तो वेळ मी ईडीकडे मागणार आहे. तसेच जिल्हा बँकेचा मी अध्यक्ष असल्याने बँकेच्या कामासाठी वेळ घेणार आहे. आतापर्यंत माझे ईडीच्या चौकशीत नाव नव्हतं. आता माझे नाव आले आहे त्यांना समाधान होईल असे उत्तर देऊ. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.’ असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक गाळे जळून खाक

दरम्यान, मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात ( High Court) धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे. तसेच याचिका दाखल केल्यानंतर मुश्रीफांचे वकील प्रशांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की “आम्ही नव्याने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. ज्या पद्धतीने सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) छापेमारी सुरु आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यापूर्वी पुण्यामध्ये या प्रकरणात मुख्य गुन्हा दाखल आहे त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या प्रकरणात हसन मुश्रीफ आरोपी सुद्धा नाहीत, हे सुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आज आम्ही ईडीला नोटीसमधून माहिती दिली असून उद्या (१४ मार्च) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणात निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही हजर होऊ शकत नसल्याची ईडीला माहिती दिली आहे.” असे वकील पाटील म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…