हरियाणाच्या क्रीडा मंत्र्यांविरुध्द गुन्हा दाखल; महिला कोचचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

चंदीगड पोलिसांनी (Chandigarh Police) भारतीय हॉकी संघाचा (India Hockey Team) माजी स्टार खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग (Hockey Player Sandeep Singh) यांच्याविरोधात महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चंदीगढच्या सेक्टर २६ पोलीस ठाण्यात क्रीडा मंत्र्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मंत्री संदीप सिंह यांच्यावर कनिष्ठ महिला प्रशिक्षकाने आरोप केल्यानंतर डीजीपींनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली. त्यात IPS ममता सिंह व समर प्रताप सिंह यांच्यासह HPS राजकुमार कौशिक यांचा समावेश आहे. ममता सिंह एसआयटीचे नेतृत्व करत आहेत. डीजीपींनी या प्रकरणाच्या संपूर्ण तपासाचा लवकर अहवाल मागवला आहे.

क्रीडामंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. ते म्हणाले की, माझ्याविरोधात कारस्थान रचण्यात आले आहे. मला त्यात नाहक गोवण्यात येत आहे. महिला कोच पंचकूलात राहण्यासाठे हे आरोप करत आहेत. याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचीही मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती त्यांनी सभापती ज्ञानचंद गुप्ता यांनाही दिली आहे.

महिला प्रशिक्षकाने नेमके काय आरोप केले आहेत?

हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि माजी हॉकीपटू संदीप सिंह यांच्यावर महिला प्रशिक्षकाने एकच नाही तर अनेक गंभीर आरोप केले आहेत.संदीप सिंह यांनी मला इंस्टाग्रामद्वारे संपर्क केला. त्यांनी माझ्याशी व्हॅनिश मोडवरून संपरक् केला होता. कारण आम्ही जे चॅट केलं होतं ते सगळं डिलिट झालं. संदीप सिंह यांनी मला त्यानंतर आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावलं. काही डॉक्युमेंट्समध्ये तुझं नाव आल्याचं मला सांगितलं आणि त्यानंतर माझ्याशी छेडछाड केली.

पीडित महिलेने हेदेखील सांगितलं आहे की तू मला खुश ठेवलंस तर तुला हवी त्या ठिकाणी पोस्टिंग मिळेल आणि सगळ्या सोयी सुविधाही मिळतील. मात्र मी त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्यानंतर माझी बदली करण्यात आली. मी जे ट्रेनिंग देत होते ते बंद करण्यात आलं. या प्रकरणी आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *