“होय मी गद्दारी केली, कारण…”; गुलाबराव पाटील यांनी जाहीरच सांगितले

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव| Jalgoan

‘पन्नास खोके.. एकदम ओके..’ (Pannas Khoke, Ekdam Okay) ही घोषणा महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचली आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीला गद्दारी असे संबोधन्यात आले. उद्धव ठाकरे गट आजही या ४० आमदारांना गद्दार असेच संबोधतो.

दरम्यान, याविषयावर शिवसेना नेते तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोकठोक भाष्य करत विरोधकांच्या आरोपांमधून हवा काढली आहे. गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं गुलाबराव पाटील जळगावात एका कार्यक्रमात म्हणाले.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमी

गुलाबराव पाटील म्हणाले की, मी गद्दार झालो नाही तर, एक मराठ चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता आणि त्याला मुख्यमंत्री करण्यासाठीच मी गद्दारी केली असे स्पष्ट उत्तर गुलाबराव पाटील यांनी टीका करणाऱ्यांना दिले आहे. तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला असे म्हणत एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केल्याची कबुली गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यु

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर त्याला महत्त्व नसतं. गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता बोअर झाले आहेत तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू, असंही गुलाबराव पाटील म्हणाले होते.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात, सरकार राजकारणात गुंतले

Share This Article