Friday, April 26, 2024
Homeराजकीयमाजी खासदार निलेश राणेंच्या वडीलांची हर्‍या नार्‍याची गँग

माजी खासदार निलेश राणेंच्या वडीलांची हर्‍या नार्‍याची गँग

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भाजपचे माजी खासदार निलेश राणेंना नैराश्य आल्यामुळे त्यांनी आरोप केले. त्यांनी मला वाळूचोर म्हणून सिद्ध करावं परंतु त्याआधी त्यांचे वडील नारायण राणे यांची हर्‍या-नार्‍याची गँग होती. असा पलटवार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.

- Advertisement -

भाजपचे नेते निलेश राणे हे सोमवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची दोर ठाकरे सरकारनेच कापली असल्याची खोचक टिका त्यांनी केली होती. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पानटपरीवरील सुपारी चोर व वाळू चोर असल्याचा घाणाघातील आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, फडणवीस सरकारने मराठा आरक्षण लागू केल होत मात्र ते कोर्टात गेल्याने सुप्रिम कोर्टाने ते नाकारल आहे. तरी देखील ठाकरे सरकारने आरक्षणाबाबत रिट याचिका दाखल करण्याचे मनोबल तयार केले आहे. मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळावे यासाठी सरकार पाहिजे ते प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

वाळूचोर असल्याचे सिद्ध करुन दाखवा

राणेंना नैराश्य आल्यामुळे त्यांना टिका करणे गरजेचे वाटत होते. माझा कुठेही वाळूचा धंदा नाही त्यांनी मला वाळूचोर म्हणून सिद्ध कराव असे खुल आव्हान ना. पाटील यांनी निलेश राणेंना दिले. मात्र सर्वांनाच माहित असेल माहिती नाही परंतू त्यांच्या वडीलांची हर्‍या नार्‍याची गँग असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

ही तर स्व. बाळासाहेंबांची शिकवण

सरकार असली मात्र आपल्याच मतदारसंघात अन्याय होत असेल. लोकांच्या भावना जाणून घेत पेटून उठण ही स्व. बाळासाहेबांची शिकवण आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगातल आंदोलन जीवंत असलच पाहिजे. पालकमंत्री म्हणून मी आमदारांनी केलेल्या आंदोलनाचा विषय कॅबीनेटच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मारहाणी प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्याचा तपास करीत असून दोषींवर कठोर करावाई करण्याच्या सूचना पोलिस विभागाला दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या