Saturday, April 27, 2024
Homeराजकीययंदाचा ‘थर्टी फस्ट’ इच्छुकांचे ‘बजेट’ वाढविणार!

यंदाचा ‘थर्टी फस्ट’ इच्छुकांचे ‘बजेट’ वाढविणार!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात तब्बल 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान 15 जानेवारी रोजी होत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर यंदाचा‘थर्डी फस्ट’ धुमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण थर्डी फस्ट तळीराम आणि खवय्यांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे पार्ट्यांमध्ये रमणार्‍या मतदारांसाठी ही आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे हा ‘थर्टी फस्ट’ इच्छुक उमेदवारांच्या खर्चाचे बजेट वाढणार आहे.

थर्टी फस्ट म्हटला की, मटण, चिकन, मासे आणि दारू यांची मोठी उलाढाल होते. त्यात यंदा निवडणुका होत असल्याने ज्या ज्या ठिकाणी चुरस आहे. तेथील तळीराम आणि खवय्यांच्या अपेक्षा वाढणार असल्याने त्या पूर्ण करताना इच्छुक उमेदवारांना नाकीनऊ येणार आहे. 31 डिसेंबर जोरात होणार असल्याने हॉटेल आणि ढाबा मालकांनीही त्यादृष्टीने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.

निवडणूक रिंगणात उतरायचेच असा बेत ज्यांनी आखला आहे. ते इच्छुक उमेदवार ढाब्यावर जेवण देण्यापेक्षा घरी किंवा शेतात बेत करणार असल्याची वंदता आहे. करोनाच्या संकटामुळे गावोगावच्या यात्रा-जत्रा रद्द झाल्याने खवय्ये जेवणावळीला मुकले आहेत. आता करोनाचा कहर कमी झाल्याने आता ही संधी खवय्यांना मिळणार आहे.

करोनाने अनेक व्यवसायात मंदीचे वातावरण होते. आता या निवडणुकीमुळे किराणा, पानटपरी, लॉन्ड्रीवाले, चहा, नाष्ट्याची हॉटेल, ढाबे, वाईन, वाहने, बारसह हातभट्टीवाले या व्यवसायात तेजी येणार आहे.

करोनाचे भान हवे..

करोनाचा कहर कमी झाला असलातरी तो पूर्णपणे संपलेला नाही. याचे भान ठेऊन सर्वांनी सामोरे गेले पाहिजे. निवडणूक चार दिवसांची आहे. पण यात कुठे निष्काळजीपणा झाला आणि कुणाला करोनाचा संसर्ग झाला तर एखाद्या जीवाला मुकावे लागून कुटुंबाची मोठी हानी होऊ शकते, अशी भीती काही जाणकार बोलून दाखवित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या