राज्यपालांनी 12 सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा

शिवसेनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन
राज्यपालांनी 12 सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा

पुणे |प्रतिनिधी| Pune

विधान परिषदेसाठी राज्यपालांनी नामनिर्देशित करण्याच्या 12 सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी पुणे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेनेच्यावतीने शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आणि आनंद दवे यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले.

राजभवन सारख्या अती महत्त्वाचा वास्तू मधून ही यादी गहाळ होणे हे अत्यंत दुर्दैवी, निंदनीय बाब असल्याचे सेनेचा वतीने दिलेल्या निवेदनात म्हणले आहे. सदर प्रकरणात राज्यपाल किंवा राजभवनातून पोलिसांना कोणती माहिती किंवा तक्रार मिळाली का असा सवाल सेना नेत्यांनी विचारला आहे. याबाबत कोणती कारवाई झाली का आणि नसेल तर ही बाब लपवण्यात का आली ? ही यादी परत का मागण्यात आली नाही? असा सवाल देखील सेना नेत्यांनी उपस्थित केला आहे.यादी सुपूर्द केली त्या दिवसापासून ते आत्ता पर्यंत राजभवनात कोण कोण आले याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे तसेच याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सेनेने केली आहे. या संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असेही या पत्रात म्हणले आहे.

राज्य सरकारचा वतीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना ६ नोव्हेंबर २०२० ला विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासाठी सदस्यांची यादी सादर करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा वतीने अनिल परब, नवाब मलिक आणि अमित देशमुख यांनी ही यादी सादर केली होती. यामध्ये शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर्फे प्रत्येकी ४ सदस्यांची नावे देण्यात आली होती. मात्र आता ती यादी राजभवनातून गहाळ झाली असे सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com