Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपाल कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत; PM मोदींकडे व्यक्त केली इच्छा

राज्यपाल कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत; PM मोदींकडे व्यक्त केली इच्छा

मुंबई | Mumbai

मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मनन करण्यात घालवायचा आपला मानस आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवल्याची माहिती आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. राजभवनने याबाबतचं प्रसिद्धीपत्रक दिलं आहे.

‘महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

एकास बेडी घालून मारहाण; उलट सुलट चर्चेला उधाण

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,’ असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मंदिराच्या उत्सवात दुर्दैवी घटना; क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

दरम्यान १२ डिसेंबर २०२२ रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होती. या पत्रात त्यांनी संपूर्ण वादावर आपली भूमिका व्यक्त केली होती. महापुरुषांचा अपमान करण्याची आपला कोणताही उद्देश नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं. गृहमंत्र्या यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हे प्रकरण शांत झालेलं असतानाच भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या विरोधात नाराजीचा सुरु उमटू लागला होता.

शिवप्रेमींकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यांच्याविरोधात राज्यभरातून निदर्शने करण्यात आली. त्यांच्या विरोधातील हे वातावरण काहीसे शांत झालेले असतानाच आता त्यांनीच स्वत:हूनच पंतप्रधानांकडे पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानात अंधारच अंधार! खाण्यासोबत विजेचेही वांदे, मेट्रो, बाजारपेठा ठप्पबाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद; ‘तो’ खास व्हिडीओ पोस्ट करत मनसेकडून बाळासाहेबांना अभिवादन

- Advertisment -

ताज्या बातम्या