Monday, April 29, 2024
Homeराजकीयराज्यात गदारोळ निर्माण होण्यासाठीच भुजबळ अशी विधानं करतात - गोपीचंद पडळकर

राज्यात गदारोळ निर्माण होण्यासाठीच भुजबळ अशी विधानं करतात – गोपीचंद पडळकर

पुणे |प्रतिनिधी| Pune

छगन भुजबळ त्यांच्या पद्धतीने भूमिका मांडत असतात. पण लोकांच्या भावना महत्वाच्या आहे. छगन भुजबळ सध्या विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे काहीच काम शिल्लक नाही, राज्यात गदारोळ निर्माण होण्यासाठीच भुजबळ अशी विधानं करीत असतात, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांच्या शारदामाता आणि सरस्वती मातेचा फोटो हवा कशाला, या वादग्रस्त वक्तव्यावर व्यक्त केली आहे.

- Advertisement -

‘अर्हम फौंडेशन’ आणि ‘वास्तव कट्टा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संवाद: स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी या कार्यक्रमासाठी  ते उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, ध्याच्या सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांचे विषय सकारात्मक घेतले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांच्या अनेक नियुक्त्या दिल्या आहेत. येत्या मंगळवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे,असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार असताना पडळकरांनी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन केले होते. आता त्यांनी या प्रश्नाबाबत मिळमिळत भूमिका घेतली आहे, असा आरोप यावेळी पत्रकारांनी केला. त्यावर पडळकर म्हणाले, “मी आताही या विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडतच आहे.

पडळकर यांच्या गावाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यांची आई सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्या बिनविरोध निवडून येतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे. याबाबत पडळकरांना विचारले असता ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असतात. गावातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी माझ्या आईचं नाव सुचवलं ते प्रक्रिया चालू आहे अजून निवडणूक पार पडलेली नाही. पण मी आणि माझ्या भावाने त्याला विरोध केला आहे. अन्य दुसऱ्याला सरपंच करा असे सूचवलं आहे,

- Advertisment -

ताज्या बातम्या