Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याGopichand Padalkar : "महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्या..."; गोपीचंद...

Gopichand Padalkar : “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्या…”; गोपीचंद पडळकरांची पुन्हा पवार कुटुंबावर टीका

मुंबई | Mumbai

भाजप (BJP) नेते तथा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी लबाड लांडग्याचं पिल्लू असे म्हणत अजित पवारांवर (Ajit Pawar) घणाघात केला होता. त्यानंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा पडळकरांनी महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये भांडण लावणारा लांडगा कोण? हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत नाव न घेता शरद पवारांवर त्यांनी टीका केली आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) एका कार्यक्रमात बोलत होते….

- Advertisement -

Rohit Pawar : अजित पवारांवर बोरवणकरांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवारांचे सूचक विधान; म्हणाले, सरकारला…

यावेळी बोलतांना आमदार (MLA) पडळकर म्हणाले की, “एसटीडी मधील एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा यांच्या नादात तुम्ही किती दिवस गुरफटणार? गुलामगिरीममधून बाहेर पडा, साहेब, ताई, दादा म्हणायचं सोडून द्या,आपला साहेब एकच आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मी जेव्हा धनगर जागर यात्रा काढली तेव्हा लांडग्यांची सगळी पिल्लं कामाला लागली, विष पेरायला लागली. परंतु, जेव्हा धनगर जागा होत तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते” असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर टीका केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती लांडगा कोण आहे. कोण लांडगा महाराष्ट्रात भांडणं लावतो. कोणत्या लांडग्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले, कुठल्या लांडग्याने बी. के. कोकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. धनगरांना एसटी आरक्षण अपेक्षित असताना एनटीचा दाखला दिला. हे कुठल्या लांडग्याने केलं? तुम्ही आमच्या मेंढपाळाला विचारा. तो त्या लांडग्याचं नाव सांगेल”, अशी टीका यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली.

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

तसेच “मागे माझ्यावर दोन वेळा हल्ले झाले. एक सोलापूर जिल्ह्यातच झाला. भला मोठा दगड माझ्या गाडीवर टाकण्यात आला. मी जे काम करतोय ते धनगर समाज, भटके समाज आणि बहुजन समाजासाठी करत आहे. मी धनगर समाजाची जागर यात्रा काढली आहे. धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे, हे प्रस्थापितांना माहिती आहे. हा समाज एकदा जागा झाला तर आपल्या स्पर्धेत येऊ शकतो आणि म्हणून हे थांबवायचे असेल तर गोपीचंदला थांबवले पाहिजे. त्यामुळे काहीही होऊ शकते. मात्र, काहीही झालं तरी धनगर आरक्षणाची चळवळ थांबता कामा नये. एसटी आरक्षणाचा दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणी शांत झोपू नये”, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसला नाशकात ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

- Advertisment -

ताज्या बातम्या