Monday, April 29, 2024
Homeराजकीयगोपाळपूरच्या सरपंच पद्मा ढोकणे सरपंच पदावर राहण्यास पात्र

गोपाळपूरच्या सरपंच पद्मा ढोकणे सरपंच पदावर राहण्यास पात्र

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील गोपाळपूरच्या सरपंच श्रीमती पद्मा ऊर्फ पद्मावती विलास ढोकणे यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत

- Advertisement -

नसल्याने त्या पदावर राहण्यास पात्र असल्याचा निकाल जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरविण्याच्या 7 जणांनी केलेल्या मागणी अर्जावर सुनावणी घेऊन दिला.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील गोपाळपूरच्या सरपंच श्रीमती पद्मा उर्फ पद्मावती विलास ढोकणे यांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे त्यांचे सरपंचपद रद्द करावे, असा ग्रामपंचायत फेरचौकशी अर्ज ज्ञानदेव रामजी घुले, एकनाथ भानुदास बर्गे, कुंडलिक चंद्रभान घुले, अंबादास मनोहर घुले श्रीधर रायभान शेरे, संजय मनोहर राऊत, प्रदीप वसंतराव ढोकणे सर्व रा. गोपाळपूर, ता. नेवासा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. त्यात सरपंचांसह ग्रामसेवकांना प्रतिवादी करण्यात आले होते.

त्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (अ) जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन निकाल दिला. सौ. पद्मा विलास ढोकणे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम अ-3 नुसार मौजे गोपाळपूर ता. नेवासा या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राहण्यास पात्र असल्याचे घोषित करण्यात येऊन त्यांना सदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर पुढील कालावधीसाठी कायम ठेवणे उचित ठरेल असे म्हटले. सरपंचांना अपात्र ठरवण्याचा अर्जदारांचा अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.

संबंधितांना प्रस्तूत आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडेस 15 दिवसांच्या आत अपिल दाखल करता येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या