माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेFile Photo

मुंबई / प्रतिनिधी
जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या माथाडी कामगारांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना रेल्वे-बसने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश बाबूराव रामिष्टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध लादताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. माथाडी कामगारांनाही या निर्बंधातून सूट देण्यात यावी, असे रामिष्ठे यांनी पत्रात म्हटले आहे. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत रामिष्ठे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

आज फळे, भाजीपाला, अन्नधान्य ते अगदी औषधांपर्यंतच्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची साखळी अविरत सुरू आहे. या साखळीत माथाडी कामगार हा महत्त्वाचा दुवा आहे. माथाडी कामगार कोरोनापासून सुरक्षित राहणार नसेल, कामाच्या ठिकाणी तो सुरक्षित पोहोचणार नसेल तर ही साखळी विस्कळीत होऊन गोंधळ निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

माथाडी कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी त्यांची नियमित आरोग्य तपासणीची व्हावी, नोंदीत कामगारांना सरकारच्या माध्यमातून किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याची यावी, माथाडी कामगारांना ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या अविनाश रामिष्ठे यांनी पत्रात केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com