गिरीश महाजन म्हणतात...बहूत उंचा उडना है हमे...

गिरीश महाजन म्हणतात...बहूत उंचा उडना है हमे...

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला.पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळाले नसले तरी 75 जागा निवडून आल्या आहेत.

बालूरघाट जिल्ह्यातील मतदार संघात माझ्याकडे जबाबदारी असलेल्या तीन मतदार संघातील उमेदवार विजयी झाले आहे.

आ. गिरीश महाजन, भाजपनेते

पंश्चिम बंगालमधील पाच मतदार संघाची जबाबदारी भाजपचे नेते आ. गिरीश महाजन यांच्यावर सोपविली होती. त्यापैकी तीन मतदार संघातील उमेदवार विजयी झाले आहेत.

त्यानिमित्ताने बढने दो हमे.. रोको मत हमे.. अभी तो शुरुवात है.. बहूत उंचा उडना है हमे...! अशी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून चांगलीच चर्चेत आली आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी देशभरातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी सोपविली होती. जळगाव जिल्ह्याचे भाजपाचे नेते गिरीश महाजन हे देखील प्रचारासाठी गेले होते.

त्यांच्याकडे पाच मतदरासंघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यापैकी बालूरघाट मधून अशोक लहरी, गंगारामपूरमधून सत्तेंद्रनाथ राय तर तपनमधून बुधुराय तुडू हे विजयी झाले आहेत.

त्यानिमित्ताने आ. गिरीश महाजन यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यात ते म्हणतात कित्येक कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले परंतु भाजपाचा राष्ट्रवादी विचार सोडला नाही.

या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या जोरावरच आम्ही ताकदीने लढलो आणि तीनवरुन 75 जागांवर पोहचलो. दरम्यान त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com