RSS चे स्वयंसेवक ते खासदार! अशी राहिली लढवय्ये गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द

RSS चे स्वयंसेवक ते खासदार! अशी राहिली लढवय्ये गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द

पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली होती. अखेर गिरीश बापट यांनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख होती.

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले.

सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर १९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.

२०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गिरीष बापट यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ४ डिसेंबर २०१४ ते 4 जून २०१९ दरम्यान त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले.

१९९६ साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. परंतु, २०१९ मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com