Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“गजानन किर्तीकर सर्व काही भोगून, प्राप्त करून...”; संजय राऊतांचं टीकास्र

“गजानन किर्तीकर सर्व काही भोगून, प्राप्त करून…”; संजय राऊतांचं टीकास्र

मुंबई | Mumbai

खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किर्तीकर यांच्या पक्षांतरावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

“किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत.पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील”, असं संजय राऊत म्हणाले.

काल मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळं कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पत्रक खासदार विनायक राऊत यांच्याकडून जारी करण्यात आले.शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या