धुळे शहराच्या विकासासाठी 7 कोटी 75 लक्ष रुपये मंजूर

आ. फारूक शाह यांची माहिती
धुळे शहराच्या विकासासाठी 7 कोटी 75 लक्ष रुपये मंजूर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकास योजनेतंर्गत शहराच्या विकासासाठी 7 कोटी 75 लक्ष रुपये मंजूर करून घेतल्याची माहिती आ. फारूक शाह यांनी दिली आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

धुळे महापालिका ही ड वर्गात असून तिची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. महापालिकेचे उत्पन्न पुरेशे नसल्यामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविता येणे शक्य होत नाही.

आजही अनेक भागांमधील नागरिक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. ही कामे करण्यासाठी मनपाकडे निधी उपलब्ध नाही. विकास कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासाठी आ. फारूक शाह यांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत वरील समस्यांचा पाढा वाचला होता.

मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध कामांना निधी उपलब्ध करून दयावा, अशी विनंती देखील केली होती. या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून शहरातील विविध प्रभागांमध्ये विकास कामांसाठी आवश्यक असलेला किमान 7 कोटी 75 लक्ष रुपये निधी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकास योजनेतंर्गत मंजूर करून घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com