Friday, April 26, 2024
Homeराजकीयपुलाच्या कामासाठी चार कोटी 79 लाख निधी

पुलाच्या कामासाठी चार कोटी 79 लाख निधी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे तालुक्यातील धाडरे गावाजवळ बोरी नदीवरील पूलाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी आ. कुणाल पाटील यांनी पाठपुरावा केला होता. पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आ. कुणाल पाटील यांना पत्र पाठवून चार कोटी 79 लाख रुपये निधीच्या कामाला मंजुरी दिल्याचे कळविले आहे.

- Advertisement -

आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाबरोबरच आरोग्याच्याही समस्या सोडविल्या आहेत. शेतकर्‍यांसाठी सिंचनाबरोबरच वीज, रस्ते, पूल, बंधारे अशा सर्वांगीण विकास साधणारे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी पाठपुरावा केला आहे. धुळे तालुक्यातील वाहत जाणार्‍या बोरी आणि पांझरा नदी परिसरातील गावांना या दोन नद्यांमुळे दळणवळणाच्या समस्या निर्माण होत होत्या.

त्यामुळे आ. कुणाल पाटील यांनी बोरी व पांझरा नदीवर विविध ठिकाणी पुलांचे बांधकाम व्हावे म्हणून आराखडा तयार केला. कुंडाणे ते वार, मोराणे प्र. नेर ते चिंचवार रस्ता आणि शिरूड ते खोरदड रस्ता हे पूल बांधून झाले. कुंडाणे ते वरखेडी, निमगुड ते नवे गाव हे पूल मंजूर झाले असून त्यांची प्रक्रिया सुरू आहे.

तालुक्यातील टप्प्याटप्प्याने पुलांची मंजुरी मिळवून घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील धाडरे गावाजवळील बोरी नदीवर पूल व्हावा म्हणून संबंधित विभागाकडून प्रस्ताव तयार करून घेतला. आ. कुणाल पाटील यांनी पाठपुरावा करून पुलासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करुन घेतला. या पुलाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून एकूण चार कोटी 79 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

बोरी नदीवरील धाडरे गावाजवळ सदर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर धाडरे-धाडरा, कुळथे, नंदाळे, बोरकुंड, होरपाडा यांच्यासह परिसरातील गावांना दळणवळणाची सोय होणार आहे. त्याचबरोबर वाहनधारकांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आ. कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर करून दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या