दरेकर यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात; चौकशीची मागणी

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar ) यांच्या ताफ्यातील वाहनांना शनिवारी पवई येथे जोगेश्वरी-लिंकरोडवर अपघात ( Accident ) झाला. सुदैवाने दरेकर यांच्या ताफ्यातील कुणालाही इजा झाली नाही. गेल्या काही महिन्यांतील दरेकर यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात होण्याची ही चौथी घटना आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे घातपाताची शक्यता व्यक्त होत असून या गंभीर घटनेची चौकशी ( Inquiry ) करण्याची मागणी भाजप आमदारांनी ( BJP MLA’S ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे.

प्रवीण दरेकर आज सकाळी जोगेश्वरी ( Jogeshwari ) येथील कार्यक्रम आटपून पुढील कार्यक्रमासाठी घाटकोपर येथे रवाना होत असताना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पवईच्या परिसरात दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनासमोर बाईकस्वार आडवा आल्यामुळे हा अपघात घडला. यामुळे दरेकर यांच्या वाहनासह ताफ्यातील तीनही गाडयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दरेकर आणि अन्य कोणालाही दुखापत झालेली नाही.

परंतु दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. आजचा अपघात हा गेल्या काही महिन्यातील चौथा अपघात आहे. दोनच दिवसांपूर्वी दरेकर सातारा, महाबळेश्वरला शासकीय वाहनांनी जाताना पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव–खंडाळा येथे त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला. याआधी जळगाव आणि मालेगाव येथे अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेता या नात्याने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध ठिकाणी भेट घेऊन तेथील प्रलंबित प्रश्न तसेच गैरव्यहाराला वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या गंभीर घटना पाहता काहीतरी घातपाताचा संशय येत आहे. म्हणूनच या सर्व घटनांची विशेष पथकामार्फत तातडीने चौकशी करावी तसेच विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षितेबाबत राज्य सरकारने योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड ( BJP MLA’s Gopichand Padalkar and Prasad Lad ) यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *