राजेंद्र पाटील-नितीन बरडे यांच्यात लढत

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भाजपातर्फे राजेंद्र झिपरु पाटील तर शिवसेनेतर्फे माजी स्थायी सभापती नितीन बरडे यांनी

नामांकन अर्ज बुधवारी 11 व्या मजल्यावर नगरसचिव विभागाकडे नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे दाखल करण्यात आले.

माघारीच्या वेळेपयर्र्त जर शिवसेना उमेदवाराने माघारी न घेतल्यास निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान घेतले जाणार आहे.

भाजपातर्फे उमेदवारीचा तिढा व गटतटाचा वाद वगैरे काही नसून पक्षीय वरिष्ठांच्या आदेशानुसार राजेंद्र झिपरु पाटील यांचे नाव जाहीर झाले व त्यांचाच एकमेव अर्ज पक्षातर्फे दाखल करण्यात आला आहे.

यावेळी सूचक व अनुमोदक म्हणून उज्ज्वला बेंडाळे व कुलभूषण पाटील हे होते. उमेदवारी नामांकन भरतांना भाजपा गटनेते भगत बालाणी, महापौर भारती सोनवणे, भाजपा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेविका सरिता नेरकर, नगरसेविका ज्योतीताई चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांची निवड निश्चित असून केवळ औपचारिकता बाकी आहे.

शिवसेनेतर्फे नितीन बरडेंचा अर्ज दाखल

शिवसेनेकडून स्थाई समिती सभापती पदासाठी नितीन बरडे यांचा अर्ज दुपारी 1 वाजेच्या सुमारास नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे दाखल करण्यात आला.

यावेळी सूचक म्हणून नितीन लढ्ढा तर अनुमोदक म्हणून प्रशोत नाईक आदी होते. यावेळी विरोधी पक्ष नेते सुनिलभाऊ महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरदभाऊ तायडे, शिवसेना अल्पसंख्याक शहर आघाडी अध्यक्ष जाकिरभाई पठाण आदी यावेळी उपस्थित होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे स्थायी सभापती पदासाठी चुरस वाढली आहे. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील समीकरण बदलणार आहे.

शिवसेना नगरसेवक नाथाभाउंच्या भेटीसाठी मुक्ताईनगरकडे रवाना झाले होते. महानगरपालिकेतही समीकरणावर परिणाम होवू शकेल, एकूण किती नगरसेवक शिवसेनेला पाठिंबा देतात, याविषयी हालचाली सुरू आहेत.

तसेच करिष्म्याची शक्यताही शिवसेनेच्या गोटात वर्तवली जात आहे. शिवसेनेचे चार सदस्य स्थायीत आहेत.

महिला बालकल्याण सभापतीपदी रंजनाताई सपकाळे बिनविरोध

महिला बालकल्याण समिती सभापती पदी प्रभाग 3 च्या नगरसेविका रंजनाताई सपकाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी रंजनाताई सपकाळे यांचा अर्ज दुपारी एक ते सव्वा वाजता भरण्यात आला.

यावेळी सूचक म्हणून प्रतिभा सुधीर पाटील तर अनुमोदक म्हणून नगरसेविका ज्योतीताई चव्हाण आदी होते. फॉर्म भरते वेळी महापौर भारती सोनवणे, माजी स्थायी सभापती अ‍ॅड. शुचिताताई हाडा, महिला बालकल्याण समिती सदस्या दीपमालाताई काळे, गायत्री राणे, रेश्मा काळे, प्रीया जोहरे, माजी महिला बाल कल्याण सभापती शोभाताई बारी आदी उपस्थीत होते. तर वरील सर्व उपस्थित सदस्यांसह नगरसेविका पार्वताबाई भिल, सुरेखा तायडे आदीही महिला बालकल्याण समितीच्या सदस्या आहेत.

तळागाळातले नेतृत्व

महिला बाल कल्याण समिती सभापती पदी नगरसेविका रंजनाताई सपकाळे यांचा एकमेव अर्ज आलेला असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

गुरूवारी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल तळागाळातील सर्वसामान्य नेतृत्वाला न्याय दिला गेला आहे.

रंजनाताई सपकाळे व त्यांचे पती भरत सपकाळे यांनी प्रभागात घरा घरापयर्र्त पोहचून विकासकामे केलेली आहेत, करीत आहेत. शांत, सुस्वभावी, संयमी असे नेतृत्व असणारे हे दाम्पत्य आहे.

त्यांना महिला बाल कल्याण समिती सभापती पद देवून पक्षाने योग्य तो न्याय त्यांना दिला आहे. सवार्र्ना विश्वासात घेवून विकासकामे केली जातील, कुणावर अन्याय होणार नाही, कुणाची नाराजी होणार नाही या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील असे सपकाळे यांनी स्पष्ट केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *