Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा

काँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज (26 ऑगस्ट) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. याआधी गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा चर्चेचा विषय बनला होता. हे पद मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.

- Advertisement -

काँग्रेस सोडल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबातत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण या सर्व चर्चांना गुलाम नबी आझाद यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले. सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रा गुलाम नबी आजाद यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना २०१३ मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर त्यांनी पक्षातील सल्लामसलतीला पूर्णपणे फाटा दिला. ती संस्कृतीच त्यांनी रद्द केली. सर्व वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना त्यांनी बाजूला केले आणि कोणताही अनुभव नसलेले केवळ तोंडचाटकी मंडळी (चाटुकार) लोक पक्ष चालवू लागले.

राहुल गांधी यांनी अध्यादेशाची कॉपी फाडण्याच्या घटनेचाही नोंद आजाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात घेतली आहे. राहुल यांची ही कृतीच पुढे लोकसभा निवडणूक २०१४ च्या पराभवाचे प्रमुख कारण ठरली. अध्यादेशाची प्रत प्रसारमाध्यमांपुढे फाडणे हे राहुल गांधी यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे कारण होते. अशा काही बालिश गोष्टींमुळे पक्षाची आतोनात हानी झाली. त्यासोबत पंतप्रधान आणि भारत सरकारच्या अधिकारांनाही त्यांनी नष्ट केले. २०१४ मध्ये यूपीए सरकारच्या पराभावाला ही घटना सर्वाधीक जबाबदार ठरली. वाचकांच्या माहितीसाठी असेकी, राहुल गांधी यांनी यूपीए सरकारने काढलेल्या एका आदेशाची प्रत फाडली होती आणि तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते.

गुलाम नबी आजाद पुढे लिहितात, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला जोरदार हार पत्करावी लागली. पक्षाचा इतका अपमानीत पराभव कधीच झाला नव्हता. तसेच पक्ष केवळ चार राज्यांमध्ये विजयी झाला. याशिवाय सहा वेळा पक्ष आघाडीच्या स्थितीमध्ये आला आणि आघाडी करण्यास असमर्थ ठरला. आज काँग्रेस केवळ देशभरामध्ये दोन राज्यांमध्ये सत्तेत आहे. आणि इतर दोन राज्यांमध्ये आघाडी करुन सत्तेत आहे.

गुलाम नबी आजाद यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे की, यूपीए सरकारच्या संस्थात्मक अखंडतेला नख लावण्याचा उद्योग ‘रिमोट कंट्रोल मॉडेल’ द्वारा करण्यात आला. हे मॉडेल आता काँग्रेसमध्येही लागू झाले आहे. सर्वात महत्त्वाचे निर्णय हे राहुल गांधी यांच्यापेक्षा त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव यांच्याद्वारेच घेतले जाऊ लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या