Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमा.खा. रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन

मा.खा. रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन

श्रीरामपूर | प्रतिनिधी | Shrirampur

औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटिल यांचे आज बुधवार दि.२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ .३० वाजता औरंगाबाद येथे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४ वाजता दहेगाव येथे होणार आहे.

- Advertisement -

दहेगाव ग्रामपंचायत सरपंच पदापासून राजकिय कारकिर्द सुरू केल्यानंतर वैजापूर पंचायत समिती सभापती, वैजापूर विधानसभा दोन वेळा आमदार, विनायक सहकारी साखर कारखाना (परसोडा) चेअरमन, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ खासदार, औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद, राज्य सहकारी बँकेचे संचालक, राजकीय कारकीर्दीत जिल्ह्यात सहकार क्षेत्रात एक मुरब्बी राजकारणी म्हणून ठसा ऊमटविलेले रामकृष्ण बाबा, श्री क्षेत्र सराला बेट, सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचे निस्सीम भक्त होते, दहेगांव येथील १९९० मधील १४४ व्या सदगुरु गंगागिरी महाराज सप्ताहासह परसोडा कारखाना, सवंदगांव, शिवराई, पालखेड दहेगाव (कारमाथा) असे भव्य दिव्य पाच संप्ताह रामकृष्ण बाबांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. पंढरपूर येथील सद्गुरू गंगागिरी महाराज मठ उभारणीत मोलाचे सहकार्य करत, मठात गंगागिरी महाराज मंदिर बांधले. पत्नी व मुलगा यांचे निधनानंतर कौटुंबिक परिवाराचे मायेचे छत्र बाबांनी अविरत ठेवले होते. त्यांच्या पश्वात दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या