धुळे - Dhule - प्रतिनिधी :

काँग्रेस पक्षाचे जुने व निष्ठावंत नेते तथा माजी आ.किसनराव खोपडे यांचे आज पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

श्री.खोपडे यांनी येथील विद्यावर्धीनी महाविद्यालयाचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्षपदही सांभाळले होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात त्यांचे योगदान होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, डॉ.संजय खोपडे यांच्यासह दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

देवपूरातील गरुड कॉलनीतील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. पांझरेकाठी असलेल्या अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ठांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.