माजी आमदार घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

jalgaon-digital
1 Min Read

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथील रहिवासी असलेले व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम (मामा) घनदाट यांचा

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यंत्री अजितदादा पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला. माजी आमदार सीताराम मामा घनदाट यांच्या रूपाने राष्ट्रवादीला एक नवीन चेहरा मिळाला आहे.

1995 ते 2009 या तीन पंचवार्षिक कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले असून अभ्युदय बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्राध्ये नावलौकिक मिळविला आहे. महाराष्ट्र, गुजरात राज्यामध्ये देशातील चार नंबरची बँक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. माजी आमदार सीताराम मामा घनदाट यांच्या प्रवेशाने पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *