
मुंबई | Mumbai
माजी मंत्री व शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
२०१८ मध्ये एका आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते. यावेळी बच्चू कडू यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.