Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्याबेपत्ता असलेले अनिल देशमुख अखेरी ईडी कार्यालयात

बेपत्ता असलेले अनिल देशमुख अखेरी ईडी कार्यालयात

मुंबई | Mumbai

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले आणि गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh)अखेर आज प्रकट झाले आहेत. हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दिलासा न मिळाल्याने आज अखेर अनिल देशमुख हे आज ईडीसमोर (ed)हजर झाले आहेत

- Advertisement -

१०० कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे.

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने (ED) वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती.

तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High COurt) त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या