Saturday, April 27, 2024
Homeराजकीय...तर एकाही मंत्र्यांला फिरु देणार नाही !

…तर एकाही मंत्र्यांला फिरु देणार नाही !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भाजपाने सर्वांत जास्त ओबीसी समाजाला मंत्रीपद देऊन न्याय दिला. मात्र सध्याच्या राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण गेले आहे.

- Advertisement -

भाजपा ओबीसींवर अन्याय करीत नाही. डेटा राज्य सरकारने तयार करायचा, असा सुप्रिम कोर्टाचा आदेश आहे. डेटा केंद्राने नाही, राज्य सरकारने द्यायचा आहे. 30 डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने डेटा तयार केला नाही तर मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यांवर फिरू देणार नाही, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या युवा वॉरिअर्स अभियानांतर्गत 18 ते 25 वयोगटातील 25 लाख युवक जाोडणार असून यामाध्यातून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आ. स्मिताताई वाघ, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, बबनराव चौधरी,आनंद सपकाळे,मनोज भांडारकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून 18 ते 25 वयोगटातील युवकांना जोडता यावे, युवाच्या आवडीचे विषय घेऊन त्यात त्यांचा सहभाग वाढवा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील 97 हजार 646 मतदान केंद्रे, आदिवासी पाडे, वस्ती, मोहल्ला आदी ठिकाणी 18 ते 25 वयोगटातील युवा वॉरिअर्स शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री भारत योजनेच्या माध्यमातून त्यांच्यात कौशल्य विकासासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येणार आहे. पुढच्या पिढीचे नेतृत्व करण्यासाटी युवा वॉरिअर्स अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

करोना महामारीच्या संकटात 18 ते 25 वयोगटातील युवकांनी समाजसेवेचे कार्य केले. युवकांना वेगवेगळ्या विषयात काम करण्यासाठी बळ मिळावे, यासाठी हा उपक्रम राज्यभर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारवर घाणाघात

राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उत्तर महाराष्ट्रात दुष्काळजन्य स्थिती आहे. धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात दुबार पेरणी सुरू आहे.

मात्र, महाविकास आघाडी सकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले. मी ऊर्जा मंत्री असताना 28 हजार कोटी शेतकर्‍यांंचे वीज बील थकित होते. मात्र, कनेक्शन कापले गेले नाही. मात्र, या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऐन खरीपाच्या पेरणीच्या काळात शेतकर्‍यांंचे वीज कनेक्शन कापण्यात आले.

शेतकर्‍यांंना पैसे भरा, मग ट्रान्सफॉर्मर देऊ, असा अनागोदी कारभार महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू असल्याचा घाणाघात त्यांनी केला. व्यक्तीगत लाभाच्या योजनांना पैसे जात नाही. कोणत्या योजनेतून जास्त पैसे मिळतील त्याच योजनेवर निधी खर्च केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. खासदार संजय राऊत हे राज्याच्या प्रश्नांवर बोलत नाही, दिल्लीच्या विषयावर राजकीय बोलतात. महाविकास आघाडी सरकार हे केवळ वेळ काढूपणा करीत असल्याची टीका त्यांनी केली.

25 लाख युवकांना जोडणार

राज्याचा विकास खुंटला आहे. राज्यभरात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी युवकांमधून क्रांती होते. म्हणून 18 ते 25 वयोगटातील युवकांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्यावतीने राज्यातील युवकांना जोडण्यात येत आहे.

एका शाखेत 28 युवक जोडून राज्यातील 25 लाख युवकांना या अभियानात जोडण्यात येणार आहे. युवकांकडून जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यात येतील. तसेच त्यांच्या मनातील विषयांना चालना देण्यासाठी आणि युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिला जाईल, असेही भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले.

गद्दारी करणार्‍यांना जनताच धडा शिकवेल

जळगाव महापालिकेतील भाजपाच्या 30 नगरसेवक पक्ष सोडून गेल्याच्या विषयावर बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जनतेने त्यांना कमळावर निवडून दिले आहे. आगामी काळात गद्दारी करणार्‍यांना जनताच धडा शिकवेल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने खडसेंना काय दिले ?

माजीमंत्री एकनाथराव खडसे हे सर्वांचे आदरणीय नेते होते.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही त्यांचा सल्ला घेत होतो.मात्र, विरोधी पक्षाने संभ्रम निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना इतक्या ताकदीने पक्षात घेतले. त्याचवेळी मंत्रीपद का दिले नाही. गेल्या दीड वर्षांपासून नाथाभाऊंना लटकवून ठेवले असून राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना काय दिले? असा प्रश्नही माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

कोणी पक्ष सोडला तर भाजपाला काहीही फरक पडत नाही. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.मग प्रवेश करताच त्यांना मंत्रीपद का दिले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुळात खडसेंवर कोणी अन्याय करेल इतकी ताकद कोणाची नव्हती.

कारण खडसे हे सर्वांसाठी आदरणीय राहिले आहेत,असेही त्यांनी स्पष्ट केले. आपले झाकण्यासाठी ईडीला दोष देणे चुकीचे आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, असेही त्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या