दिल्लीत काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

दिल्लीत काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

दिल्ली | Delhi

दिल्ली विधानसभेचे (Delhi assembly) माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्वीकारले.

गेल्या वर्षी योगानंद शास्त्री यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. योगानंद शास्त्री हे काँग्रेस पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ नेते होते. काँग्रेस सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्रिमंडळात काम केले आहे. तसेच, दोन टर्म ते विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत.

या पक्षप्रवेशावेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपला पर्याय देण्यासाठी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रवादीचे सहकारी पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, राजधानी दिल्लीमध्ये पक्षाची जी स्थिती असायला पाहिजे होती तशी नव्हती. दिल्ली शहरात काँग्रेस पक्षाचे संघटन नाही. त्यामुळे आम्हाला इथे अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com