Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिकमधील माजी नगरसेवक शिंदे गटात; संजय राऊत म्हणाले...

नाशिकमधील माजी नगरसेवक शिंदे गटात; संजय राऊत म्हणाले…

मुंबई | Mumbai

नाशिकमधील शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे….

- Advertisement -

शिंदे गटात जाणारे ते माजी नगरसेवक दलाल आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. ठाकरे गटाने मुंबईसह नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का; १० माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

नुकताच संजय राऊत (Sanjay Raut) यांचा नाशिक दौरा पार पडला होता. मात्र त्यानंतर काही दिवसातच नाशिकच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे.

मोर्चाबाबत संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारकडून अद्याप महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचे सरकार हे अलोकशाही पद्धतीने सत्तेत आले आहे. आम्ही त्यांना त्याच मार्गाने खाली खेचू. आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेचा आहे. या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही ठरेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या