काँग्रेसला मोठा धक्का! सुष्मिता देव यांचा राजीनामा

काँग्रेसला मोठा धक्का! सुष्मिता देव यांचा राजीनामा

कोण आहे सुष्मिता देव?

दिल्ली | Delhi

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या (All India Mahila Congress) अध्यक्षा व पक्षाच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे (Former Congress MP Sushmita Dev resigns from the party). पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

सुष्मिता देव (Sushmita Dev) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना सोमवारी सकाळी एक पत्र पाठवलं आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावं, अशी विनंती देखील सुष्मिता देव (Sushmita Dev) यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा (Member of Congress) राजीनामा देत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. तसेच, पक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे. सुष्मिता देव यांनी पत्रात म्हटलं आहे की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात”.

राजीनामा देण्यापूर्वी सुष्मिता देव यांनी ट्वीटरवरही आपल्या प्रोफाईलमध्ये काँग्रेसची माजी सदस्य असा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे सुष्मिता देव यांनी पक्षाचा व्हाॅट्सअॅप (WhatsApp) ग्रुपही सोडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तीन दशकांपासून त्या काँग्रेससोबत जोडल्या गेल्या होत्या. सुष्मिता देव या टीम राहुल (Team Rahul) सदस्य होत्या. सुष्मिता देव यांनी पक्ष सोडण्याचं कोणतेही कारण अद्याप दिलेलं नाही.

कोण आहे सुष्मिता देव?

काँग्रेसचे नेते संतोष मोहन देव (Santosh Mohan Dev) यांच्या त्या कन्या आहेत. सुष्मिता देव या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. सुष्मिता देव यांनी महिला काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. काँग्रेसच्या आघाडीच्या फळीतील नेत्या अशी त्यांची ओळख आहे. सुश्मिता या गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसशी संबंधित होत्या. दरम्यान सुष्मिता देव यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल (CAA) काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली होती. तेव्हापासून त्या चर्चेत होत्या. आसाम मधील बराक खोऱ्याचे प्रतिनिधीत्व त्या करत होत्या. तेथील जनतेचा सीएएला पाठिंबा असल्याने आपणही या विधेयकाच्या बाजूने आहोत, असे देव यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान त्या लवकरच कोलकाता येथे जाणार असून त्या तृणमूल कॉग्रेसच्या अध्यक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा अभिषेक बॅनर्जी यांना भेटणार आहेत. काही दिवसापासून त्या तृणमूल कॉग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com